केंद्राच्या कृषी धोरणाचा निषेध करून चोपडा काँग्रेसतर्फे बुद्ध पौर्णिमा व विलासराव देशमुख यांना अभिवादन



चोपडा,दि. 26 ( प्रतिनिधी) चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे दि. 26 मे 2021 रोजी कस्तुरबा हायस्कूल चोपडा येथे लोकनेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व .विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्याच प्रमाणे बुद्ध जयंती च्या निमित्ताने गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला . जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट संदीप पाटील यांचे आदेशानुसार बुद्ध पौर्णिमा व विलासरावजी देशमुख यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री के. डी. चौधरी सर यांनी पुष्पांजली अर्पण केली. यावेळी के डी चौधरी सर यांनी आपले विचार व्यक्त केले.बोलताना त्यांनी लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या स्मृती काँग्रेस जणांसाठी प्रेरणादायी असून त्यांनी लोकनेते म्हणून जनमाणसात स्थान प्रस्थापित केले. काँग्रेसचे निष्ठावंत सैनिक म्हणून काँग्रेस जणांचे ते स्फूर्तिस्थान आहे. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दया, क्षमा, शांती या बुद्धांच्या विचाराची आजही देशाला गरज असल्याचे प्रतिपादन केले .चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात येऊन त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला .या वेळी विलासराव देशमुख अमर रहे. जय जवान, जय किसान. जय हिंद, जय भारत अशा घोषणा देण्यात आल्या .26 मे हा दिवस ेतकर्‍यांनी काळा दिवस पाळला. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याने त्यांनी ते त्वरित मागे घ्यावेत म्हणून चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे मागणी करण्यात आली. केंद्राच्या कृषी धोरणाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी रमाकांत सोनवणे ,पर्यवेक्षक श्री मोरे सर ,संजय चौधरी सर, कोष्टी सर, जितेंद्र प्रकाश चौधरी आदींनी पुष्पांजली अर्पण केली व गौतम बुद्ध व विलासरावजी देशमुख यांना विनम्र अभिवादन करून वंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने