अनवर्दे खुर्द पीक संरक्षण सोसायटी चेअरमनपदी संजीव शिरसाठ तर व्हाय. चेअरमनपदी जिजाब बोरसे यांची निवड* चोपडा दि. 26 (प्रतिनिधी) तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील लोकजागृती पीक संरक्षक सोसायटी चेअरमनपदी संजीव पांडुरंग शिरसाठ यांची तर व्हाय.चेअरमनपदी जिजाब देवराम बोरसे यांची एकमताने निवड करण्यात
अनवर्दे खु येथिल लोकजागृती पीक संरक्षण सोसायटी ही संस्था अवसायनात गेली होती. संस्थेचे पुनरुज्जीवन मार्च २०२१ मध्ये होवुन साह्यक निबंधक सहकारी संस्था चोपडा याच्या आदेशानुसार दि. २५/०५/२०२१ रोजी आर.डी.पुरोहीत सहकार अधिकारी( वर्ग ०२) तथा अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन चेअरमन व व्हा चेअरमन याची निवड घेण्यात आली. चेअरमन पदासाठी संजीव पांडुरंग शिरसाठ याचा एकमेव तर व्हा. चेअरमन पदासाठी जिजाबराव देवराम बोरसे यांंचा एकमेव अर्ज आल्याने चेअरमन ,व्हा चेअरमन यांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी लोटन सोनजी शिरसाठ, दिलिप बोरसे, सतिष बोरसे,भिका अहिरे , आनंदा शिरसाठ,सौ. विजयाबाई बोरसे, रमाबाई तिरमले,आदी उपस्थित होते.उपरोक्त निवडीचे श्रीकांत नेवे पत्रकार, नंदलाल मराठे जिल्हा अध्यक्ष , भगवान न्हायदे, पत्रकार,विश्राम तेले जिल्हा उपाध्यक्ष भा.पत्रकार महासंघ
व गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.