पं.बंगालमध्ये यास वादळाचा तडाखा : तुफानी पाऊस उद्या पोहोचेल झारखंडमध्ये


 कोलकाता दि. 26: जगभरात नव नवीन वादळांनी धुमाकूळ घातला असून पश्चिम बंगाल मध्ये वादळांसह पावसाने तुफानी हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे, पावसाने अतोनात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. हे वादळ उद्या झारखंडमध्ये पोहचणार असल्याने तेथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
यास चक्रीवादळामुळं (Yass Cyclone) पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास 180 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. दक्षिण 24 परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने