**रूग्णांना जीव ओतून व्याधीमुक्त जीवन देणारे डॉक्टर*
~~~~~~~~~~~~~
*खोटारडा आरोप खपवून घेणार नाहीत : डॉ. हेमंत पाटलांचा खुलासा**
~~~~~~~~~~~~~
चोपडा दि. 26 :- *रूग्णालयात आलेल्या सर्व रूग्णांना जीव ओतून मनोभावे सेवा देण्यासाठी सर्वच डाॅक्टर तत्पर असतात. मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित सेवेकरीस जबाबदार धरणाऱ्यांची संख्या पुढे येऊ लागली असल्याने वैद्यकीय क्षेत्रात धास्तीचे वातावरण होऊ पाहत आहे.नुकतीच संपुल्याची महिला गतप्राण झाल्याने मला दोषी ठरवून जबाबदार धरणे योग्य नसून सेवा देणाऱ्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न कदापी मान्य करणार नाही. शेकडो रुग्णांवर प्रामाणिकपणे उपचार करून व्याधीमुक्त जीवन देणारे डॉक्टर असा खोटारडा आरोप खपवून घेणार नाहीत. शिवाय रुग्णालयाची बदनामीही सहन केली जाणार नाही असा परखड खुलासा मालती हाॅस्पीटलचे डॉ. हेमंत पाटील यांनी केला आहे.*
मी डॉ. हेमंत नरेंद्र पाटील ,मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, चोपडा येथे गेल्या तीन वर्षांपासून 'फिजिशियन' म्हणून कार्यरत आहे. मी व माझ्या हॉस्पिटलच्या टीमने असंख्य सामान्य, गंभीर व अतिगंभीर रुग्णांवर उपचार केलेले आहेत. त्यात आम्हाला काही अपयश देखील आले आहे परंतु तरी देखील आतापर्यंत एकही तक्रार नाही.
डॉक्टर हा देव नसून मनुष्यच आहे. रुग्णांना चांगली सेवा देणे हाच आमचा पेशा आहे दि. 21-5 -2021 रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटला सिंधुबाई मच्छिंद्र पाटील वय- 66 वर्ष रा. सनपुले या मावशींना बेशुद्धावस्थेत आणण्यात आले. त्यांच्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असल्यामुळे त्यांना तात्काळ स्ट्रेचरवरून आयसीयूमध्ये दाखल करून घेतले. मावशींना हाय ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यासारख्या गंभीर आजारांचा पूर्व इतिहास होता असे नातेवाईकांनी सांगितले. या सर्व बाबींचा विचार करून मावशींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रक्ताचे रिपोर्ट करण्यास सांगितले व मावशींच्या बीपी चेक केला असता बीपी वाढला होता,तो कमी करण्यासाठी अंतरनिले द्वारे इंजेक्शन देऊन शर्तीचे प्रयत्न केले. ( मावशींना लघवीची नळी टाकली, नाकावाटे तोंडातून पोटात नळी(RT) टाकली.) तसेच ईसीजी काढला व आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. रक्ताचे रिपोर्ट आल्यानंतर त्यात इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्स आढळून आला, त्यात सोडियमचे प्रमाण कमी दिसून आले.त्यानुसार माझ्या परीने प्राथमिक उपचार केल्यानंतर मी मावशीची अवस्था अतिशय गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी पुढे नेण्याची आवश्यकता किंवा गरज पडू शकते याची पूर्ण कल्पना नातेवाईकांना दिली असता त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून सर्व जबाबदारी आमची राहील याची खात्री दिली त्यामुळे मी पुन्हा पुढील उपचार सुरू ठेवले.
त्यानंतर मावशींची तब्येत रात्री जेव्हा खालवली तेव्हा मी स्वतः रात्री हॉस्पिटलला येण्यापूर्वी मावशींना ऑक्सिजन लावण्याच्या स्टाफला सूचना दिल्या. त्यानंतर तात्काळ हॉस्पिटलला येऊन मावशींची तपासणी करून चिकित्सा केली असता मावशींच्या तब्येतीत सुधारणा न दिसल्यामुळे मावशींना व्हेंटिलेटरवर घेण्यात आले. हे सर्व करत असतांना मावशींचे नातेवाईक व माझा चार जणांचा स्टाफ माझ्या मदतीला उपस्थित होता.इतके शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ही मावशींची श्वसनक्रिया व हृदयक्रिया अचानक बंद पडल्यामुळे मावशींचा मृत्यू झाला.त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा आम्ही मावशींच्या नातेवाईकांना सल्ला दिला ,परंतु ते आम्हास व स्टाफला दमदाटी करून मावशींचा मृतदेह जबरदस्तीने सोबत घेऊन गेले.मी आतापर्यंत साथीच्या काळात स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता सुविचार व मालती हॉस्पिटलच्या माध्यमातून चोपडा वासियांची अहोरात्र सेवा केली व करत आहे. तसेच मी चोपडा तालुक्यातील नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी बांधील आहे.
वैद्यकीय सेवा देतांना माझे मानसिक खच्चीकरण केल्यामुळे माझ्या मनात राहून राहून शंका उपस्थित झाली आहे "अति गंभीर अवस्थेतील रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे किंवा कसे".
अशी साशंकता निर्माण झाली आहे. यावर प्रतिक्रिया देण्याची माझी कोणतीच मानसिकता नव्हती, परंतु सामाजिक माध्यमातून माझी व हॉस्पिटलची बदनामी होत असल्याने, माझ्यावर होणारे दोषारोप हे मला मान्य आहेत असा गैरसमज होऊ नये यासाठी सदर खुलासा करीत आहे असेही डॉ. हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.शिवाय माझ्याकडून कोणाच्या भावना कळत नकळत दुखावल्या गेल्या असतील तर मी सर्वांची जाहीर माफी मागतो. अशी पुष्टीही त्यांनी केले आहे
👏👏👏👏👏👏👏👏