माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना जिल्हा संपर्कपदी हेमकांत गायकवाड

 माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना' जिल्हा संपर्क प्रमुख पदी' हेमकांत गायकवाड 


चोपडा दि. 23 (प्रतिनिधी) जळगांव जिल्ह्यातील चोपडा येथील रामपुरा ,कैकाडी वाडा या भागातील रहिवासी ,युवा सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार, पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपुर्ण योगदान, समाजसेवा हिच ईश्वर सेवा हि धुरा मनाषी बाळगुन समाज सेवा करणारे 'हेमकांत गायकवाड' यांची स्वराज्य पोलीस मित्र संरक्षण आणि माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी हेमकांत गायकवाड यांच्या पत्रकार क्षेत्रातील कार्याची दखल घेत जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती पत्र देऊन निवड केलेली असून, या निवडीप्रसंगी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, प्रदेश अध्यक्ष अमर बेदे्, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे, राज्यकार्याअध्यक्ष उमेश काशीकर, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कौसर शेख, पुष्कर सराफ, वजीर शेख, आदींनी 'हेमकांत गायकवाड' याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच 'हेमकांत गायकवाड' म्हणाले की आपल्या संघटनेच्या कामात अहोरात्र प्रयत्न करून आपली संघटना जळगांव जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात प्रत्येक तालुक्यातील जनतेच्या समस्या, पत्रकारांना येणाऱ्या अडचणी, पत्रकारांना वृत संकलन करताना, व इतर कोणत्याही अडचणी आल्यास नक्कीच संघटनेच्या, व जिल्हा अध्यक्ष यांच्या सहकार्याने प्रयत्न करू.असे वक्तव्य हेमकांत गायकवाड यांनी निवडी प्रसंगी केले आहे.



चोपडा तालुका प्रतिनिधी

हेमकांत गायकवाड

मो. 7798202488

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने