**व्रत आणि पूजा अशी करा..*
~~~~~~~~~~~~~
हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचा असतो. दरमहिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो
हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचा असतो दरमहिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो. यावेळी 24 मे रोजी म्हणजेच आज प्रदोष व्रत आहे. यावेळी प्रदोष व्रत सोमवारी येत आहे, म्हणून त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदूंच्या मते, सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत येतो, तेव्हा या व्रताचे महत्त्व आणखीन वाढते
सोम प्रदोष व्रत 2021 तिथी आणि शुभ मुहूर्त
*शुभ तिथी प्रारंभ* : 24 मे रोजी सकाळी 3:38 वाजता
*शुभ तिथी समाप्त* : 25 मे रोजी सकाळी 12:11 वाजता
*काल प्रदोष* सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 24 मे रोजी रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होईल.
*सोम प्रदोष व्रत 2021 पूजा विधी*
🌼 हिंदू पुराणानुसार, प्रदोष व्रत तिथी सूर्यास्तानंतर येते, म्हणून भक्तांनी सूर्यास्तानंतरच पूजा करावी.
🌼पूजेपूर्वी आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला
🌼विधी सुरु करण्यापूर्वी पूजेची सर्व सामुग्री गोळा करा
🌼गंगाजल आणि फुलांनी भरलेले कलश किंवा मातीचे भांडे ठेवा.
🌼 या दिवशी अभिषेक करणे शुभ असते, म्हणून शिवलिंगावर गंगाजल, दूध, तूप, दही, मध अर्पण करा.
🌼शिवलिंगाला उदबत्ती, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा
🌼प्रदोष व्रताची कथा वाचा, शिव चालीसा वाचा. महा मृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. आरती करुन पूजा समाप्त करा.
*महामृत्युंजय मंत्र*
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्
*सोम प्रदोष व्रत 2021 चे महत्त्व*
हिंदू मान्यतांनुासर, जे लोक या दिवशी भगवान शिवची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात त्यांना आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि शांततापूर्ण जीवनाचा आशीर्वाद मिळतो. तसेच, जे ग्रहांच्या अशुभ परिणामांनी ग्रस्त असतात त्यांना दिलासा मिळतो. काही महिला भक्त वरदान किंवा संतान प्राप्तीसाठी उपवास ठेवतात.
*सोम प्रदोष व्रत 2021 उपवासाचे नियम*
🌼भगवान सूर्य यांना अर्घ्य द्या
🌼 ब्रह्मचर्याचं अनुसरण करा
🌼ध्यान करा आणि आपल्या अंतःकरणाशी जुळण्याचा प्रयत्न करा
🌼ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा
🌼 उपवासादरम्यान फळे, दूध, साबुदाणा, शिंगाडा इत्यादीचं सेवन तुम्ही करु शकता.
🌼 मद्य आणि तंबाखूचे सेवन टाळा
🌼अपशब्दांचा प्रयोग करु नका
🌼कांदा, लसूण, तांदूळ, गहू आणि मांसाहारी पदार्थ खाण्यास टाळा