विधान परिषद सदस्य नियुक्ती लांबणीवर

~~~~~~~~~~~~~
 *ना. जयंत पाटलांचे मोठे विधान* 
~~~~~~~~~~~~~
 *कोल्हापूर दि. 24* :-
विधान परिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीवरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याने राजकीय गोटात अस्वस्थता पसरली आहे. राजकिय कारकीर्दीत असा प्रसंग कधीच उद्भवला नसून राज्यपाल यांनी खाजगीत बरेच काही सांगितले असल्याचा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी आज कोल्हापूर येथे केला.
 
'आत्तापर्यंत राज्यात अनेकांची सत्ता आली आणि गेली, पण 'अशी 'वागणूक कोणत्याच राज्यपालांनी सरकारला दिली नाही. सरकार ज्या शिफारशी करते, त्या राज्यपालांनी मान्यच करायच्या असतात,' असं परखड मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मांडलं.
बारा विधान परिषद सदस्यांच्या विषयावर बोलताना जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले, आम्ही स्वतः बारा सदस्यांचा प्रस्ताव राज्यपालांच्या हातात दिला आहे. अनेकदा त्याची आठवण करून दिली आहे. त्यावेळी त्यांनी काही गोष्टी आम्हाला खासगीत सांगितल्या. त्या इथे आम्ही उघड करू शकत नाही. तरीही प्रस्ताव नसल्याचे सांगत असतील तर हे फारच आश्चर्यकारक आहे . राज्यपाल हे राज्याचे प्रमुख आहेत. ते मुद्दाम असे करतात असे मी म्हणणार नाही.मात्र १२ सदस्यांची पदे बराच काळ रिक्त आहेत, याचं शल्य जनतेला आहे. त्यामुळे रोष वाढत आहे. म्हणून तर प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे.असेही त्यांनी सांगितले. 
 
विधान परिषद सदस्य निवडीसाठी आज पर्यंतच्या कोणत्याही राज्य सरकारला एवढा मोठा संघर्ष करावा लागला नाही त्यामुळे जनतेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे असा प्रसंग वारंवार उद्भवल्यास जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास खचून जाण्याची त्यांनी भीती व्यक्त केली 






Post a Comment

थोडे नवीन जरा जुने