महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्यूनियर कॉलेज मुलींचा क्रिकेट संघ विजय

 महाजन माध्यमिक व ना.भा.पाटील ज्यूनियर कॉलेज मुलींचा क्रिकेट संघ विजय

धानोरा,ता.चोपडा दि.१(प्रतिनिधी ) चोपडा येथे झालेल्या शासकीय  १७ वर्षांआतील मुलीच्या क्रिकेट स्पर्धेत झि तो महाजन माध्यमिक व ना भा पाटील ज्यूनियर कॉलेज धानोरा विद्यालयाच्या संघाने घवघवीत यश संपादन केले. विवेकानंद माध्यमिक विद्यालय चोपडा विरुद्ध धानोरा विद्यालय संघात चुरशीचा अंतिम सामना झाला. यात धानोरा विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला तर विवेकानंद विद्यालय संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजयी संघाला क्रीडाविभाग प्रमुख देविदास महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

     धानोरा विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, शालेय समितीचे ज्येष्ठ संचालक बी एस महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, अनिल महाजन, व्हि सी पाटील, मुख्याध्यापक के एन जमादार, पर्यवेक्षक एल डी पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस पी महाजन, तालुका क्रीडा समन्वयक आर पी आल्हाट, नरेंद्र महाजन, अमोल पाटील, विजय पाटील, अरविंद जाधव, समाधान माळी व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी आणि पालकांनी विजयी मुलींचा संघ व क्रीडाशिक्षक यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने