वृद्धांनी जीवन जगताना "मी हे केले, न ते केले "असे न मांडता सर्वांशी जुळवून घ्यावे : ब्रह्माकुमारी जयश्री दीदी
चोपडा,दि.१ (प्रतिनिधी) वृद्धांनी जीवन जगताना सहनशक्ती ठेवावी मी हे केले ,मी ते केले ,मला हे आवडत नाही, हा विचार या पिढीकडे मांडून काही उपयोग नाही म्हणून जीवन जगताना सर्वांशी जुळवून घ्यावे असे विचार ब्रह्माकुमारी जयश्री दीदी यांनी येथे व्यक्त केले. आडगाव येथील ओम शांती केंद्रात आज ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात ब्र. कु. दीदी बोलत होत्या- त्यापुढे म्हणाल्या की, मनुष्य कर्म सोबत घेऊन जातो म्हणून त्याचे संस्कार चांगले पाहिजेत शेवटी हेच बरोबर जाते. आजची पिढी काही ऐकत नाही? म्हणजे त्या संस्कार आहेत ते वृद्धांना ही जीवन जगणे सोपे जाते असेही त्यांनी यावेळी आपल्या मुरलीद्वारे सांगितले. भाई डॉक्टर ईश्वर पाटील यांनी वृद्धांना मार्गदर्शन केले यावेळी कवी रमेश पाटील यांनी गुजराऊ भाषेत" तुम्हनं काय समजस" ही कविता सादर केली टाळ्यांच्या कडकडात माता भगिनींनी व उपस्थित जेष्ठ नागरिकांनी कवितेला दाद दिली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मच्छिंद्र पाटील यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच पंडित बापू पाटील, श्रीराम नाना उर्फ दामोदर पाटील, प्रगतिशील शेतकरी अंबादास पाटील ईश्वर भाई, अर्जुन भाई, माणिक भाई, मंगल पाटील, रामलाल पाटील, भास्कर पाटील आदी उपस्थित मान्यवरांचे औक्षण ब्रह्मा कुमारी त्रिवेनाबाई पाटील यांनी केले. सर्वांना यावेळी ज्येष्ठ नागरिकांना औषधी ठेवण्यासाठी प्लास्टिकची पेटी देण्यात आली.
