चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

 चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

चोपडा,दि.३(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश पाटील महाविद्यालयातील महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र तसेच इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

       या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या एम. सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. 

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.बी. सूर्यवंशी हे उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, उपप्राचार्य पी. एस. पाडवी व रजिस्ट्रार  डी. एम.पाटील आदि उपस्थित होते.

      यावेळी महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्राच्या प्रमुख सौ. सुनिता एस. पाटील यांनी प्रास्ताविकातून महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. 

     याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. शैलेशकुमार वाघ यांनी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी : विचार व आजचा तरुण’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महात्मा गांधींचे जीवनकार्य, सत्य, अहिंसा, समानता, धैर्य, नेतृत्वगुण व संघटन कौशल्य यांचा विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. तसेच महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा स्वीकार करून तरुणांनी सामाजिक परिवर्तनात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

       महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, महात्मा गांधी यांच्या जीवनावरील पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले.

     यानिमित्ताने दि. २५ सप्टेंबर रोजी पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. डॉ. मुकेश पाटील व डॉ. संगीता पाटील यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यात गौरी धनगर हिने प्रथम, जानवी पाटील हिने द्वितीय तर आरती साळुंखे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

     ‘राष्ट्रपुरुष महात्मा गांधी यांचे जीवनकार्य’ या विषयावर दि. २६ सप्टेंबर रोजी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. डॉ. एम. एल. भुसारे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यात प्राजक्ता गुरव प्रथम, आदित्य साळुंखे द्वितीय तर गौरी धनगर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.

     दि. २९ सप्टेंबर रोजी आयोजित रांगोळी स्पर्धेत खुशी पाटील, पुनम कंखरे व शितल सोनवणे यांनी प्रथम क्रमांक, मोक्षदा राणे, सुवर्णा ठाकरे व जानवी साळुंखे यांनी द्वितीय क्रमांक, तर गायत्री महाजन व कल्याणी नाथबुवा यांनी तृतीय क्रमांक मिळविला. प्राजक्ता गुरव व कोमल पाटील यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण सौ. अनिता सांगोरे व सौ. सुनंदा नन्नवरे यांनी केले.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले.  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवृत्ती पाटील, मोतीराम पावरा, सौ. पुष्पा दाभाडे, नितेश पाटील व सौ.शुभांगी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मुक्ता पाटील हिने केले तर आभार कल्याणी नाथबुवा यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने