अडावद सार्वजनिक विद्यालयात शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा संपन्न

 अडावद सार्वजनिक विद्यालयात  शासकीय चित्रकला  ग्रेड परीक्षा संपन्न 

चोपडा दि.३(प्रतिनिधी) तालुक्यातील अडावद येथील सार्वजनिक विद्यालयात दि.28 /09/2026ते दि.1/  10/202 6 या कालावधीत शासकीय ड्रॉईंग ग्रेड परीक्षा ( एलिमेंटरी व इंटरमिजीएट ) संपन्न झाली. या परीक्षेत एलिमेंटरी ग्रेड परीक्षेला   252 व इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेला 251 असे एकुण   503 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या परीक्षेचे इ.10 वीच्या बोर्डाच्या निकालात A श्रेणीसाठी 7 गुण, B श्रेणीसाठी  5 गुण व C श्रेणीसाठी 3 गुण दिले जातात.परीक्षेचे कामकाज केंद्रसंचालक  .अशोक कदम मुख्याध्यापक सार्वजनिक विद्यालय अडावद आणि केंद्र समन्वयक  .अर्जुन कोळी ( कलाशिक्षक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगांव ) यांनी पाहिले.या परीक्षेला अडावद परीसरातील  शामराव येसो महाजन अडावद, नूतन ज्ञान मंदिर अडावद, अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगांव, स्व.सै.शा.गो.पाटील माध्यमिक विद्यालय वर्डी,शारदा माध्यमिक विद्यालय खर्डी,श्रीमती ए.के.पाटील माध्यमिक विद्यामंदीर मंगरूळ, झि.तो.माध्यमिक विद्यालय धानोरा, ओ.जी.पाटील माध्यमिक विद्यालय बिडगांव-कुंड्यापाणी,अँग्लो ऊर्दू हायस्कूल अडावद या शाळा प्रविष्ट होत्या. परीक्षा यशस्वीतेसाठी कलाशिक्षक सुर्यकांत चव्हाण,दिपक शिसोदीया,मुकुंदा तायडे,भुषण सानप,राजु कापुरे,सिराज तडवी,     श्रीमती सारीका चरडे  शरीफ तडवी   तबस्सूम खान  आदी नी सहकार्य केले  तसेच परीक्षा पार  पाडण्यासठी सार्वजनिक विद्या लयातील मुख्याध्यापक    पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने