वर्डी ग्रामस्थांचे उपोषण माजी जि.प.सदस्य सुनिल पाटील व गटविकास अधिकारी बरगे मॅडम ह्यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन सांगता..
चोपडा दि.३(प्रतिनिधी) : वर्डी तालुका चोपडा येथील ग्राम पंचायतीच्या कथीत भ्रष्टाचाराची चौकशी पुर्ण होउनही अहवाल सादर करण्यास विलंब होत असल्या कारणाने वर्डी येथील श्री.अविनाश शिंदे ह्यांचे चार दिवसा पासुन चे छ.शिवाजी महाराज चौक चोपडा येथे आमरण उपोषणाची सांगता झाली.
अविनाश शिंदे ह्यांची चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी शासनाने पुर्ण केल्यामुळे उपोषणाची सांगता श्री सुनिल पाटील, वाळकी, चोपडा व गटविकास अधिकारी बरगे मॅडम ह्यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन करण्यात आले.त्या प्रसंगी ग्राम विकास विभागाचे अधिकारी,व श्री.प्रकाश पाटील मोठ्या संख्येने वर्डी ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
