प्रताप विद्या मंदिर (NCC विभाग) कडून तिरंगा रॅलीचे आयोजन

 प्रताप विद्या मंदिर (NCC विभाग) कडून तिरंगा रॅलीचे आयोजन

 





  चोपडा दि.१४(प्रतिनिधी):  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत 49, महा.बटालियन NCC अमळनेर यांच्या आदेशानुसार  प्रताप विद्या मंदिर,चोपडा व दादासाहेब डॉ.सुरेशजी पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली ची सुरवात  दादासाहेब डॉक्टर सुरेश जी पाटील महाविद्यालय चोपडा येथून करण्यात आली करण्यात आली.  प्राचार्या प्रा. संध्या सोनावणे यांनी रॅलीला NCC ध्वज दाखून मार्गस्त केले.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट NCC कॅप्टन प्रा. बी. एम. सपकाळ यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. के. एन. सोनवणे, प्रताप विद्यामंदिरचे NCC अधिकारी श्री. रोहन पाटील व सौ. जयश्री बडगुजर प्रताप विद्यामंदिर शाळेतील ८० NCC कॅडेट्स व महाविद्यालयातील २५ कॅडेट्स उपस्थित होते.  भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल आदर निर्माण करणे आणि प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. NCC कॅडेट्सनी शिस्तबद्ध पद्धतीने तिरंगा हातात घेऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’,‘जय हिंद’ तसेच ‘हर घर तिरंगा’ अशा देशभक्तिपर घोषणांनी देण्यात आल्या. चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे NCC कॅडेट्स च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. पुढे ही रॅली मार्गस्थ होऊन प्रताप विद्यामंदिर येथे पोहोचली व तेथे प्रशालेच्या मुख्याध्यापिका  माधुरी पाटील मॅडम उपमुख्याध्यापक श श्री ए. एन.भट सर ,पर्यवेक्षक आदरणीय श्री पंकज नागपुरे सर यांच्या उपस्थितीत या रॅलीची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने