समाजकार्य महाविद्यालयात चोपडा ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा*

 समाजकार्य महाविद्यालयात चोपडा ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

चोपडा,दि.14(प्रतिनिधी:)भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथे आज १२ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतातील ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे  श्री रमेश एस पाटील मुख्याध्यापक महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लासूर ता. चोपडा जि.जळगाव यांनी ग्रंथालयाचे महत्त्व स्पष्ट करताना, ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असून विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासली पाहिजे. असे प्रतिपादन केले.वाचन हे विद्यार्थी जीवनातील ज्ञानप्राप्तीचे महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि शब्दसंपत्ती वाढते. नियमित वाचनाची सवय असल्याने अभ्यासातील आकलनशक्ती सुधारते.

कार्यक्रमात ग्रंथालयाचे महत्त्व, वाचन संस्कृतीचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर कसा प्रभाव पडतो यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईश्वर सौदाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आले. यावेळी ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

ग्रंथपाल डॉ. कल्पना सोनवणे  यांनी ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयात डॉ. एस आर रंगनाथ यांच्या ग्रंथालय आणि माहिती शास्त्र क्षेत्रातील योगदान विषयी  माहिती दिली.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आशिष गुजराथी, ग्रंथालय समितीचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच प्राध्यापक सहकारी,ग्रंथालय कर्मचारी आणि विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात ग्रंथपाल दिनाची सांगता झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने