चोपडा महाविद्यालयात पत्रलेखन कार्यशाळा संपन्न
चोपडा, दि. १६(प्रतिनिधी) : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे, दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाच्या पत्रलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
भाषा विषयाचे शिक्षक श्री एस. बी. पाटील, श्रीमती डी. एस. पाटील, श्री एन बी पाटील,श्री. व्ही. डी. शिंदे, श्री. बी. आय. बिरारी, श्रीमती पी. आर. दाभाडे, श्री डी. एम. अलाम, श्री. आर. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना पत्रलेखनाची मूलभूत तत्त्वे, पत्राची रचना, योग्य प्रारूप, भाषाशैली तसेच औपचारिक व अनौपचारिक पत्रलेखन याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पत्रांचे लेखन प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून शिकविण्यात आले. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पत्रलेखन कौशल्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून त्यांना प्रभावी व अचूक लेखनासाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याचा विकास व्हावा आणि इंग्रजी विषयातील परीक्षेची तयारी अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली.कार्यशाळेच्या उद्घाटन व समारोप प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री पी. एस. पाडवी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना पत्रलेखनात येणाऱ्या अडचणीबाबत अवगत करून मोलाचे मार्गदर्शन केले
