धानोरा विद्यालयाची तिरंगा रॅली उत्साहात

 धानोरा विद्यालयाची तिरंगा रॅली उत्साहात 

धानोरा,ता.चोपडा (प्रतिनिधी):  झि तो महाजन माध्यमिक व ना भा पाटील ज्यूनियर कॉलेज धानोरा विद्यालयात प्राचार्य के एन जमादार यांच्या मार्गदर्शनात शासनाचा हर घर तिरंगा घर घर तिरंगा देशभक्तीपर उपक्रम  उत्साहात साजरा करण्यात आला.

     विद्यालयाचे क्रीडाशिक्षक  देविदास महाजन यांनी तिरंगा ध्वजा विषयी सविस्तर माहिती दिली. तिरंगा राष्ट्रभक्तीचे प्रतीक असून सर्वांनी तिरंगा ध्वजाचा सन्मान करण्यास सांगितले. सर्व विद्यार्थी ,शिक्षक व ग्रामस्थांनी आपल्या घरावर तिरंगा लावून सोबत सेल्फी काढण्यास प्रेरित केले. घरा घरावर फडफडणाऱ्या तिरंगा ध्वजा मुळे गावात राष्ट्रभक्तीचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यालयापासून संपूर्ण गावात तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले. बँड पथकासह सर्व विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज, बॅनर घेऊन गावकऱ्यांना घरावर तिरंगा फडकविण्यासाठी आवाहन केले. हर घर तिरंगा घर घर तिरंगा,  तिरंगा हमारी शान है, भारतीयोकी जान है, वंदे मातरम्, भारत माता की जय सारख्या असंख्य घोषणांनी विद्यार्थ्यांनि सपूर्ण गाव दणाणून सोडला. विद्यालयाचे चेअरमन प्रदीप महाजन, जेष्ठ संचालक वामनराव महाजन व ग्रामस्थांनी तिरंगा रॅली चे स्वागत केले. चेअरमन प्रदीप महाजन, जेष्ठ संचालक बी एस महाजन, वामनराव महाजन, योगेश पाटील, सागर चौधरी, प्राचार्य के एन जमादार, पर्यवेक्षक एल डी पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस पी महाजन यांनी तिरंगा रॅली चे कौतुक व अभिनंदन केले आणि सर्व विद्यार्थी व पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

      कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ एस पी महाजन, क्रीडाविभाग प्रमुख देविदास महाजन, एस एच तडवी, सी बी सोनवणे, ए पी शिरसाठ, एस एस पाटील, डी एस बडगुजर, डी व्हि सोनवणे, एम व्हि महाजन, एच एस चौधरी, इ टी भामरे, वाय व्हि बाविस्कर, ए पी पाटील, जे व्हि महाजन मॅडम राजेंद्र पाटील, देविदास साळुंखे, संतोष कोळी, कुलदीप महाजन यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने