चोपडा महाविद्यालयात बोगनवेलिया वेलवर्गीय वनस्पतीचे वृक्षारोपण

 चोपडा महाविद्यालयात बोगनवेलिया वेलवर्गीय वनस्पतीचे वृक्षारोपण

चोपडा,दि.८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात महाविद्यालय सुशोभीकरण समितीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोगनवेलिया या वेलवर्गीय वनस्पतीचे वृक्षारोपण  महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ.संध्या एम. सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.  

बोगनवेलिया वेलवर्गीय वनस्पती ही साधारणतः भिंती किंवा झाडाच्या कडेने लावली जाते, त्याचे मुख्य कारण म्हणजे ही वनस्पती कुंपण तयार करण्यासाठी व शोभिवंत फुलांसाठी प्रसिद्ध आहे. सदर वृक्षारोपणाचे कार्य हे महाविद्यालयाच्या सुशोभीकरण समितीच्या अंतर्गत राबविण्या आले. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.के. एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा. डॉ .बी. एम. सपकाळ व समन्वयक डॉ. एस. ए. वाघ, रजिस्ट्रार डी. एम. पाटील, वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. पी. एन.सौदागर, डॉ. जे. जी. पाटील, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एच. जी. सदाफुले आदि उपस्थित होते.या  वृक्षारोपणासाठी वनस्पतीशास्त्र विभागातील तृतीय वर्ष वर्गाची विद्यार्थिनी प्रेरणा ब्रिजलाल पाटील, आर. व्ही. पाटील व भरत भालेराव यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने