लासूर येथे SIR संदर्भात जनजागृती; तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा मतदारांशी संवाद

 लासूर येथे SIR संदर्भात जनजागृती; तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांचा मतदारांशी संवाद 


चोपडा दि.८(प्रतिनिधी) :लासूर येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानाच्या अनुषंगाने लासूर गावात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधतजनजागृती केली. यावेळी त्यांनी SIR प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगत स्वतः मतदारांकडून SIR फॉर्म भरून घेत फॉर्म भरण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

       मतदारांना आवश्यक कागदपत्रे, फॉर्म भरण्याची योग्य पद्धत तसेच निर्धारित मुदतीत अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावातील CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) चालकांनाही मतदारांकडून SIR फॉर्म अचूकपणे भरून घेण्याच्या आणि नागरिकांना आवश्यक ते सहकार्य करण्याच्या सूचना तहसीलदार थोरात यांनी दिल्या.

       याच अनुषंगाने लासूर येथील कन्या शाळेत बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत SIR अभियान प्रभावीपणे राबविणे, मतदार नोंदणी प्रक्रियेत अचूकता राखणे, प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचणे तसेच फॉर्म भरण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करण्याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी BLO यांना मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या. या उपक्रमामुळे मतदारांमध्ये SIR प्रक्रियेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार असून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेला अधिक गती मिळणार आहे.

 याप्रसंगी मंडलाधिकारी श्री हरपे,ग्राम महसूल अधिकारी भूषण पाटील,ग्रामविकास अधिकारीरमेश देवरे, पोलिस पाटील जितेंद्र पाटील,पत्रकार दिलीप पालीवाल ,जेष्ठ पत्रकार श्रीराम पालीवाल आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने