बेकायदा गांजा बाळगणारा पोलिस जाळ्यात..शहर पोलिसात गुन्हा

 बेकायदा गांजा बाळगणारा पोलिस जाळ्यात..शहर पोलिसात गुन्हा

चोपडा,दि.१८ (प्रतिनिधी)चोपडा ते शिरपूर रोडवरील  बंद पडलेल्या टोलनाक्यासमोर चोपडा शहर पोलिसांनी अमली पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या एका इसमाला रंगेहात पकडून त्याच्याकडून २ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजासह इतर मुद्देमाल हस्तगत करून आरोपीला जेलची हवा दाखविली आहे.

  पोलीस सूत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार,  विजय मुसा पावरा (वय ३५ वर्षे, रा. महादेव दोंडवाडे, पोस्ट हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) हा आपल्या ताब्यातील टी.व्ही.एस. कंपनीच्या मोटरसायकलवरून (क्र.एम एच १८ सी ए ३१७१) शिरपूरकडून चोपडाकडे येत होता तो गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत असताना पोलिसांना आढळून आला.

 त्याच्यकडून गांजा सदृश पदार्थ: २१,२०० रुपये किमतीचा, २.१२० किलो ग्रॅम वजनाचा, उग्र वास असलेला हिरवट रंगाचा गांजा,  ७०,हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची टी.व्ही.एस. कंपनीची मोटरसायकल,मोबाईल: १०,हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा  पोलिसांनी जप्त केला आहे.

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस काँस्टेबल महेंद्र युवराज पाटील यांनी फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (सी) सह २०(बी)(ii)(बी), २२(बी) प्रमाणे गुन्हा (गु.र.नं. ३००/२०२६) दाखल करण्यात आला असून  आरोपीला  अटक करण्यात आली आहे

ही कारवाई चोपडा विभागाचे एस.डी.पी.ओ. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक पवन देसले पो.उपनिरी. सचिन चौधरी व पोना. जगदीश चौधरी  यांनी कारवाई  केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.उपनिरी. सचिन चौधरी करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने