निरपेक्ष सेवा करा हाच मोक्षाचा मार्ग आहे -पूज्य निलेशजी

 निरपेक्ष सेवा करा हाच मोक्षाचा मार्ग आहे -पूज्य निलेशजी



चोपडा दि.७(प्रतिनिधी ): -चोपडा श्रीराम नगर येथे अधिक मासाचे औचित्य साधून के डी चौधरी यांचे अमृत महोत्सवाचे निमित्ताने आयोजित गोभागवत कथेचा पहिल्या दिवसाची कथा प्रेममूर्ती गो कथाकार निलेश जी यांच्या अमृतवाणीद्वारे उत्साहात संपन्न झाली. 

कथेत शिव पार्वतीचे संवादाचे प्रसंग सांगून श्रीमद भागवत कथेचे महत्व विषद केले. कथेच्या माध्यमातून प्रबोधन करताना निरपेक्ष सेवा, आई वडिलांची सेवा, करा हाच मोक्षाचा मार्ग आहे असे नमूद केले. प्रबोधन करताना त्यांनी मोबाईलचा वापर मार्यादेत करून अनावश्यक गोष्टीसाठी वापर टाळा असे आवर्जून सांगितले. सूर्योदयापूर्वी उठावे म्हणजे आरोग्य चांगले राहील. कथेच्या माध्यमातून उत्तम प्रबोधन पूज्य निलेशदादा यांनी केले. कथेच्या सुरवातीला संकट मोचन हनुमान मंदिरापासून गोमातेची व श्रीमद भागवत ग्रंथाची विधिवत पुजाकरून शोभा यात्रा काढण्यात आली. यात्रेत उत्सव समितीचे अध्यक्ष टी एम चौधरी , देवकांत चौधरी, किरण आनंदा चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, लखन तेली, मोरे अप्पा, जगदीश मिस्तरी, के डी चौधरी , सौ प्रिया सूर्यकांत चौधरी, सौ धनश्री देवकांत चौधरी, गोभक्त परिवारव भाविकांनी भाग घेतला. कथेच्या विश्राम होताना टी एम चौधरी यानी महाराजांचे स्वागत केले. यावेळी पूज्य निलेश दादा यांनी के डी चौधरी सर यांना 75वी पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा देऊन पुष्पमाला अर्पण करून सत्कार केला. महाराजांनी उत्सव समितीचे अध्यक्ष टी एम चौधरी सर, गो शाळेचे अध्यक्ष देवकांत के चौधरी, गो भक्त लखन तेली यांचा सत्कार केला. पहिल्या दिवशी कथेच्या प्रारंभी वरून देवाने हजेरी लावल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. सर्व भाविकांनी रोज सायं 7ते रात्री 10 गो भागवत कथेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने