चोपड्यात ८जून ते १४जून दरम्यान दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथा..ताराचंद हरसाय अग्रवाल परिवाराचे आयोजन..कथावाचक श्रीधाम मिथीलावासी राजीव कृष्णाजी महाराज ..
चोपडा दि.७(प्रतिनिधी) : तालुक्यातील विरवाडा येथील ताराचंद हरसाय अग्रवाल परिवारा मार्फत दिनांक ८ जून ते 14 जून दरम्यान भव्य दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन अग्रसेन नगर अरे शेअर मंदिराजवळ जुना शिरपूर रोड चोपडा येथे करण्यात आले आहे.श्रीधाम मिथीलावासी भागवताचार्य गोवत्स श्रद्धेय राजीवकृष्णाजी महाराज यांच्या सुश्राव्य कथा वाचनाचा कार्यक्रम होत आहे .शेवटच्या दिवशी रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.
प्रतिदिवशी दुपारी २ ते ६ वाजेच्या दरम्यान दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथेचे होणार श्री श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य संत बालयोगीजी महाराज व परमपूज्य संत रामरिछपालदासजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम अग्रवाल परिवाराने आयोजित केला आहे.आहे.पहिल्यादिवशी म्हणजे दिनांक 8 जून 2026 सोमवार रोजी सकाळी ९ते ११ दरम्यान कलश यात्रा निघणार आहे.यानंतर दुपारी 2:00वाजता भागवत महात्म्य ची कथा होणार आहे. तर ९ रोजी सुखदेव परीक्षेत चरित्र संवाद ,१० रोजी ध्रुवचरित्र कपिल उपारव्यम, ११ रोजी श्रीराम जन्म ,श्रीकृष्ण जन्मोत्सव, १२रोजी माखन चोरी, गोवर्धन पूजा, १३ रोजी रूक्मणी स्वयंवर महारासलिला,तर शेवटच्या दिवशी 14 जून रोजी सुदामा चरित्र परीक्षित मोक्ष व पूर्णाहुती होती असा कार्यक्रम होणार आहे .त्याच दिवशी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या दिव्य संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावे असे आवाहन आयोजक मुन्नाभाई अग्रवाल तथा ताराचंद हरसाय अग्रवाल परिवारातर्फे करण्यात आले आहे.
