राष्ट्रीय स्तरीय फाली संमेलन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडे शाळेतील विद्यार्थ्यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड

 राष्ट्रीय स्तरीय फाली संमेलन मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय अकुलखेडे शाळेतील विद्यार्थ्यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड                              


चोपडा ,दि.७(प्रतिनिधी): जैन इरीगेशन जळगाव येथे फाली कंपनी कडून आयोजित राष्ट्रीय स्तरीय बिझनेस प्लॅन या गटात  पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, अकुलखेडे शाळेतील विद्यार्थ्यांची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. या स्पर्धसाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील साठ शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेसाठी शाळेतून मानस पाटील, हर्षल मोरे, अल्केश बाविस्कर, विशाल पाटील या मुलांची निवड शाळेने केली होती, त्यांचे मार्गदर्शक शिक्षक  राकेश सपकाळे यांनी या स्पर्धेसाठी मदत केली होती. बिझनेस प्लॅन मध्ये मुलांनी कृषी यंत्र सेवा हे स्टोअर व ॲप बनवले होते हे स्टोअर लहान शेतकऱ्यांना कृषी साहित्य भाडे तत्वावर देत असते असे 15 यंत्र साहित्य स्टोअर मध्ये उपलब्ध होते. 2016 या वर्षापासून शाळेत फाली ही कंपनी इ.8 वी व 9 वीच्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञान चा उपयोग करून शेती कशी करायची व विविध प्रकारचे व्यवसाय आधारित शिक्षण पद्धत शाळेत शिकवत असते. मुलांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  डॉ श्री. सुरेश शामराव पाटील, मुख्याध्यापक  पी. एस. पाटील ,  सचिन पाटील, श्रीमती भारती चौधरी ,  संदीप पाटील सर व शाळेचे सर्व स्टाफ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने