चोपडा आगार परीसरातील २०० मिटर नो पार्कींग झोन मधील वाहनधारकांवर कारवाई

 चोपडा आगार परीसरातील २०० मिटर नो पार्कींग झोन मधील वाहनधारकांवर कारवाई 


चोपडा ,दि.७(प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा बसस्थानकाच्या परीसरातील २०० मिटर नो पार्कींग झोन  मध्ये अवैध प्रवाशी वाहतुक करणारे वाहनधारकांवर वाहतुक शाखा, सुरक्षा व दक्षता शाखा व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आगार प्रमुख मुख महेंद्र पाटील यांनी मोहीम राबवली.परीवहन मंत्री तथा अध्यक्ष म रा प रीवहन महामंडळ यांनी दिलेल्या सुचने नुसार  उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी अवैध प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात दिलेल्या निर्णयानुसार रा प महामंडळाच्या सर्व बसस्थानकाच्या २०० मिटरच्या आत खाजगी वाहने प्रवाशी घेण्यास किंवा उतरविण्यास व अवैध वाहतुकीस मनाई करण्यात आली असल्याने सदर निर्णायाची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन,वाहने २०० मिटरच्या आत उभी राहणार नाहीत व अवैध वाहतुक होणार नाही.याची काटेकोरपणे दक्षता घैण्याकरीता वरील आदेशानुसार २०० मिटर नो पार्कींग झोनची प्रभावी अंमलबजावणी करणे बाबत दिनांक ६ जुन ते १५ जुन या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याने आगार प्रमुख महेंद्र पाटील,स्थानक प्रमुख नितीन सोनवणे, सागर सावंत, सुरक्षा रक्षक संदिप पाटील यांच्या सह कर्मचाऱ्यांनी २०० मिटर नो पार्कींग झोन मध्ये उभी असलेले अवैध वाहतुक करणारे वाहनांना मज्जाव करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने