धडाकेबाज पोलिस निरीक्षक पवन कुमार देसले यांचा चाललायं पोलिसी दंडा.. अन् गुन्हेगारांमध्ये थरार..! ♦️चोपड्यात अवैध दारू विक्रेत्यांपासून वाहनचालकांपर्यंत धडक कारवाया.. जवळपास ५० गुन्हे दाखल..

 धडाकेबाज पोलिस निरीक्षक पवन कुमार देसले यांचा चाललायं पोलिसी दंडा.. अन् गुन्हेगारांमध्ये थरार..!

♦️चोपड्यात अवैध दारू विक्रेत्यांपासून वाहनचालकांपर्यंत धडक कारवाया.. जवळपास ५० गुन्हे दाखल..

चोपडा दि.८(प्रतिनिधी)शहर पोलिसात  नुकत्यानेच आलेल्या पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांनी अवैध धंदे, वाहतूक व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर चांगली पोलीसी छडी चालवली असून दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याचा चांगलाच सपाटा चालवला आहे. गेली  5 जून ही तारीख गुन्हेगारांना "ब्लॅक डे" ठरावी अशी ठरली आहे.अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या 7 केसेस तर जुगाराच्या चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे इतकेच नव्हे अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन जणांना तर रात्री  बे रात्री फिरणाऱ्यांवर बी.पी.अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे .मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 30 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून ट्रिपल सीट, विना लायसन, फॅन्सी नंबर प्लेट , रहदारीस अडथळा, दारू पिऊन गाडी चालविणे अशा एक ना अनेक गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा चालवून नांग्या ठेवण्याचे काम चालविले आहे.विशेष म्हणजे अत्यंत संवेदशील कामगिरी करत एका बेपत्ता महिलेला शोधून काढण्यातही यश मिळवले आहे . त्यामुळे अवैध वाहतूक असो वा गुन्हेगार असो यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे . चोपड्याला अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर धडाकेबाज, नीडर, धाडसी अॅक्शनबाज पावरफुल दबंग पोलीस अधिकारी शहराला लाभल्याने नागरिकांनी प्रथमच मोकळा सोडल्याचे म्हटले आहे.

 जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अडीशनल एसपी.नखाते व उपविभागीय अधिकारी श्री.कोथे यांच्या आदेशा नुसार चोपडा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत पोनि पवन देसले  व पोलीस टीमने अत्यंत प्रभावीपणे 'ऑल आऊट ऑपरेशन' राबवण्यात आले.या मोहिमेदरम्यान गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंदे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. 

 केलेल्या कारवाईचा संक्षिप्त तपशील खालीलप्रमाणे:

अवैध धंदे व अंमली पदार्थ विरोधी कारवाई: चोपडा शहर पोलीस पथकाने धडक कारवाई करत 

1) अवैध देशी दारू विक्री व हातभट्टी नष्ट करून ०७ केसेस करून गुन्हे दाखल केलेत.

2)  जुगाराच्या ०४ केसेस करून आरोपी विरुद्ध 4 गुन्हे दाखल केल्या आहेत. 

3) तसेच, NDPS 

 कायदा नुसार - Narcotic Drugs and Psychotropic Substances Act) 

(अंमली पदार्थ) चे सेवन करणाऱ्यांवर ०२ केसेस करून 2 गुन्हे दाखल केलेत.

4) रात्री बेरात्री संशयित पकडून १२२ बी.पी. ॲक्ट अंतर्गत ०१ केस नोंदवण्यात नोंदवून 01 गुन्हा दाखल केला.

ALl out ऑपेरेशन मोहिमेदरम्यान परिसरातील ०४ धाब्यांची कसून तपासणी (Checking) करण्यात आली.

मोटार वाहन कायदा (M.V. Act) अंतर्गत कारवाई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ३० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यामध्ये प्रामुख्याने:

विना लायसन्स: ०५ केसेस (दंड ₹२,५००/-)

ट्रिपल सीट: ०३ केसेस (दंड ₹३,०००/-)

फॅन्सी नंबर प्लेट: ०२ केसेस (दंड ₹२,०००/-)

रहदारीस अडथळा: ०७ केसेस (दंड ₹३,५००/-)

विना नंबर प्लेट: ०३ केसेस (दंड ₹१,५००/-)

६६/१९२ M.V. Act आणि ड्रंक अँड ड्राईव्ह (१८५ M.V. Act): 

( दारू पिऊन वाहन चालवीने 3 केसेस...

( प्रत्येकी दंड 10,000 रु.)

एकूण 

प्रतिबंधात्मक कारवाई 06 व इतर कायदेशीर कारवाई: न्यायालयीन प्रक्रियेला गती देत ०५ वॉरंट (Warrant Served) बजावण्यात आले. इतर MV ऍक्ट च्या केसेस दाखल केल्या असून, ०३ ट्रॅव्हल्स गाड्यांची तपासणी करण्यात आली.

विशेष कामगिरी: याच ऑपरेशन दरम्यान शोध मोहीम राबवून अत्यंत संवेदनशील कामगिरी करत ०१ बेपत्ता महिला (Missing Woman) शोधून काढण्यात चोपडा शहर पोलिसांना यश आले आहे.

चोपडा शहर पोलीस स्टेशनतर्फे वरीलप्रमाणे सर्वंकष आणि उत्कृष्ट कामगिरी बजावण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने