हस्ती को ऑप बॅंक चोपडा शाखेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त..१८रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी,जनरल हेल्थ चेकअप आणि भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
♦️ रक्तदात्यास मिळणार १ लाखांचा अपघाती विमा व आकर्षक भेट वस्तू
चोपडा,दि.९ (प्रतिनिधी)हस्तीमल बँकेच्या चोपडा शाखेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी ,जनरल हेल्थ चेकअप व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 18 जून कोणाच्या 26 गुरूवार रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत हस्ती भगवान महावीर मार्ग,जुन्या चावडी ऑफिसजवळ मेन रोड चोपडा येथे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू व सर्टिफिकेट मिळणार असून रक्तदात्याच्या नावाने एक लाख रुपयाचा अपघाती विमा काढून मिळणार आहे.
मोफत नेत्र व मोतीबंदी तपासणी डॉक्टर सचिन कोल्हे (श्री गणेश नेत्रालय) हे करणार आहेत तर जनरल हेल्थ चेक अप डॉ. समृद्धी गुजराती (जीवन ज्योती हॉस्पिटल )हे करणार आहे
दि हस्ती को ऑप बँकेने पारदर्शक व्यवहार, विनम्र व तत्पर ,अविरत 55 वर्षाची प्रदीर्घ सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बजावली आहे .बँकेच्या चोपडा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवित असते. त्याचा भाग म्हणून उपरोक्त कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे रक्तदात्यास आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रक्ताची गरज भासल्यास रक्ताची पिशवी बँकेतर्फे मिळवून देण्यात येणार आहे.
तरी या तीन्ही शिबिराचा लाभ जनतेने मोठ्या प्रमाणात घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष कैलास शांतीलालजी जैन, उपाध्यक्ष संजय नेमीचंद दुग्गड, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन मदनलाल शांतीलाल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीष केसरीमलजी जैन, चोपडा शाखा सल्लागार समितीचे चेअरमन कुशलकुमार अनिल जैन ,व्हाईस चेअरमन जीवन ओंकार चौधरी, प्रवीण ताराचंद अग्रवाल, श्याम ओंकारदास लाड, शैलेश पारसमल बरडिया, डॉ. दीपक सिंग रुपसिंगजी चौधरी, निलेश मोरेश्वर देसाई, चोपडा शाखा व्यवस्थापक प्रणव गिरीषजी गुजराथी यांनी केले आहे.
