चोपडा पीपल बँकेच्यावतीने 11 जून रोजी प्रा. अरुणभाई गुजराती व विठ्ठल काका गुजराती यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिर आरोग्य, रक्तदान व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन

 चोपडा पीपल बँकेच्यावतीने 11 जून रोजी प्रा. अरुणभाई गुजराती व विठ्ठल काका गुजराती यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य, रक्तदान व कॅन्सर निदान शिबिराचे आयोजन


चोपडा दि.९( प्रतिनिधी)येथील दि चोपडा पीपल्स को ऑप बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  माजी विधानसभा सभापती प्रा.श्री अरुण भाई गुजराती व श्री. विठ्ठल काका गुजराती यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 11 /06 /2026 रोजी सकाळी 9 वाजता चोपडा पीपल बँकेच्या वरच्या मजल्यावरील सभागृहात भव्य आरोग्य , रक्तदान ,कॅन्सर  निदान व बॉडी फॅट अनालिसिस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात राहुल शेलार, संतोष वडेलकर, श्री घन:शाम अहिरे, श्री योगेश आगळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

 नाव नोंदणीसाठी शशिकांत पाटील(मोबाईल क्र. 9881495841) ,डॉ. कांतीलाल पाटील (9975401062),मितेश पोद्दार ( 9922007488), सागर महाजन (9172777710), सागर माळी (7020971271), प्रसाद सोनार ( 8668297445 ),मिलिंद तांबट (9766742511 ),प्रदीप सोनार ( 9421549161) यांच्याकडे संपर्क साधावा.

तरी या महाशिबिराचा लाभ जनतेने मोठ्या प्रमाणे घ्यावा असे आवाहन चोपडा पीपल बँक अध्यक्ष श्री चंद्रहासभाई गुजराती व संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने