चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुद्रूक येथील शेतकऱ्याची केळी पिकात फसवणूक
गलंगी,ता. चोपडा दि.१३(प्रतिनिधी):-चोपडा तालुक्यातील अनवर्दे बुद्रूक येथील केळी उत्पादक शेतकरी मयूर रामकृष्ण पाटील यांनी छत्रपती संभाजी नगर येथील कृष्णा अग्रो सर्विसेस अजित सिड्स प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीने टिश्यू कल्चर केळीचे रोपं लागवडीसाठी आणले होते. संबंधित शेतकर्याला जवळ जवळ दिड लाख रुपये खर्च आला असून शेतात १५ ते २० दिवसापूर्वी हे केळीचे रोपं आणून लागवड केली आहे. परंतु लागवड केलेल्या केळीचे रोपांची वाढ होत नसल्याने शेतकर्यांचे निदर्शनास आले. यासंदर्भात कंपनीचे अधिकार्यांशी संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे.
वास्तविक गलंगी, वेळोदे, घोडगाव, कुसुंबा, दगडी, मोहिदा, अनवर्दे बुद्रूक, वढोदा, अजंती,दगडीसिम,विटनेर,वाळकी,हा पुर्ण परिसर केळीचा पट्टा म्हणून ओळखला जातो.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर केळीची शेती केली जाते. परंतु मयूर रामकृष्ण पाटील या शेतकर्याने व्याजूनी पैसे काढून हा खर्च केला. १५ ते २० दिवस लागवडीला झाले तरी पाहिजे तशी केळीचे रोपं वाढत नाही. शिवाय जागेवरच लागवड केलेली केळीचे रोपं बसत असल्याने शेतकरी मयूर पाटील हा पुर्ण पणे हतबल झाले आहेत. काय करावे हेच सुधरत नसल्यामुळे मयूर पाटील यांची मोठी फसवणूक झाल्याचे कळते आहे.
