ज्येष्ठ नागरिक संघात एस.टी. ncmc कार्ड काढणे शिबिर संपन्न
चोपडा,दि.११(प्रतिनिधी): ज्येष्ठ नागरिक संघात आज दिनांक ११/६/२०२६ रोजी सकाळी ८:००वाजता चोपडा ज्येष्ठ नागरिक संघातील सभासद बंधू भगिनींना एस.टी. ncmc कार्ड काढणेचा ॅकम्प ठेवण्यात आलेला होता. वेळेवर उपस्थित सभासद बंधू भगिनींचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांनी स्वागत केले. आणि सदर कार्ड काढणे किती आवश्यक आहे. त्याचे मिळणारे फायदे बाबत मार्गदर्शन केले. व कार्ड काढणे सुरू करणे बाबत एजन्सी चे कर्मचारी यांना सुचित केले, शेवट पर्यंत ६२ जेष्ठ नागरिक संघाचे बंधू भगिनींनी लाभ घेतला.
यावेळी संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख, उपाध्यक्ष नेरपगारे,सभासद जेष्ठ सभासद गोविंदराव मराठे , गोकुळ पाटील, विलास पाटील, प्रा. एस. एम. पाटील, देवांग सर, परशुराम पेंढारकर, लेखक व कवी रमेश जे. पाटील, भालेराव रामकृष्ण माळी, प्रकाश चौधरी, एकनाथ पाटील, अरुण पाटील हे हजर होते.
