प्रताप विद्यामंदिर शाळेची यशाची उज्ज्वल परंपरा कायम १०वी परिक्षेत मुलींमधून यशश्री चव्हाण ९७.६० टक्के गुण मिळवत प्रथम
चोपडा,दि.८(प्रतिनिधी) : येथील प्रताप विद्या मंदिराच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी एस एस सी मार्च २०२६ परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तुंग यश संपादन करत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे.शाळेचा एकूण निकाल ९७.३६ टक्के लागला असून सेमी इंग्रजी विभागाचा निकाल ९७.५४ टक्के,तर उर्दू विभागाचा निकाल ९६.२९ टक्के लागला आहे. टेक्निकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. कु.यशश्री विश्वनाथ चव्हाण या विद्यार्थिनीने ९७.६० टक्के गुण मिळवत शाळेतून तसेच मुलींमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर चि.जय राजेश लोहारआणि चि.सचिन योगेश शिंपी या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण मिळवत मुलांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
उर्दू विभागातील जोया एजाज पठाण हिने ९२.२० टक्के गुण मिळवत उर्दू विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेतून ३१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करत भरघोस यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी , भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशकाका जैन तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका एम.डब्लू.पाटील ,उपमुख्याध्यापक ए.एन.भट, उपप्राचार्य जे एस शेलार, पर्यवेक्षक एस.व्ही.करमरकर ,पी.एन.नागपुरे, एन एम राजपूत, समन्वयक गोविंदभाई गुजराथी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
