नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम...
चोपडा,दि.८(प्रतिनिधी): तालुक्यातील अडावद येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एसएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून सेमी माध्यम चा निकाल शंभर टक्के लागला असून मराठी माध्यम चा निकाल 80 टक्के एवढा लागला आहे. एकत्रित विद्यालयाचा निकाल शेकडा 80 टक्के एवढा लागला आहे. सेमी माध्यम मधून चिरायू रमाकांत पाटील 85.60 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम आला आहे. तर द्वितीय क्रमांक कु दामिनी प्रवीण पवार व कु दिव्या वसंत पाटील या दोन्ही विद्यार्थिनींना 84.20 एवढे गुण प्राप्त झाले आहेत. विद्यालयातून तृतीय क्रमांक कु भारती सुरेश प्रजापती या विद्यार्थिनीने प्राप्त केला असून या विद्यार्थिनीला 83.40 एवढे गुण मिळाले आहेत. तर मराठी माध्यमातून कु निकिता रवींद्र कुंभार ही विद्यार्थिनी प्रथम आली असून या विद्यार्थिनीला 77.40 टक्के गुण मिळाले आहेत. विद्यालयातून मराठी माध्यमातून द्वितीय क्रमांक कु दिशा भारत साळुंखे 74.80 टक्के गुण मिळाले आहेत तर विद्यालयातून मराठी माध्यमातून तृतीय क्रमांक कु प्रीती जय श्रीकृष्ण साळुंके 73.60 टक्के गुण मिळाले आहेत. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व सन्माननीय पालक बंधू भगिनींचे संस्थेचे चेअरमन आदरणीय डॉ के पी थेपडे साहेब, संस्थेच्या सचिव आदरणीय सौ सुषमाताई थेपडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बी के साळुंखे सर, उपमुख्याध्यापक श्री के आर कणखरे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री बी पी महाजन सर, श्री व्ही एल राठी सर यांनी अभिनंदन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी देखील अभिनंदन केले.
