वर्डी येथील स्वा. सै. श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय ८३%टक्के निकाल

 वर्डी येथील स्वा. सै. श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय ८३%टक्के निकाल


चोपडा दि.8(प्रतिनिधी)स्वा. सै. श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय, वर्डीचा SSC परीक्षेत उल्लेखनीय निकालमार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत स्वा. सै. श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय, वर्डी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यालयाचा एकूण निकाल 83.14% लागला आहे.

यामध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% लागून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे, तर मराठी माध्यमाचा निकाल 73.21% इतका लागला आहे.

सेमी इंग्रजी माध्यमातून गोविंदा ज्ञानेश्वर बडगुजर यांनी 90% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पाटील प्रांजल अनिल यांनी 82% गुणांसह द्वितीय तर हर्षाली चंपालाल चव्हाण यांनी 80.20% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

मराठी माध्यमातून चैताली सुनील भोई यांनी 72.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला. दिव्या भरत धनगर यांनी 71.20% गुणांसह द्वितीय तर साई चंद्रकांत पाटील यांनी 69.80% गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मा. चेअरमन, शालेय समिती, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने