पंकज विद्यालयाची अनुष्का कन्हैये इयत्ता 10 वी च्या परीक्षेत विद्यालयातुन प्रथम

 पंकज विद्यालयाची अनुष्का कन्हैये इयत्ता 10 वी च्या परीक्षेत विद्यालयातुन प्रथम

 चोपडा,दि.८(प्रतिनिधी) : येथील पंकज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या मार्च 2026 च्या परीक्षेत 99.05% निकाल लागलेला असून विद्यालयाची अनुष्का सुनिल कन्हैये या विद्यार्थिनीने 97.60% गुण घेऊन विद्यालयातुन प्रथम आलेली आहे. विद्यालयाचा निकाल 99.05% लागला असून ऐतिहासिक निकालाची परंपरा कायम राखलेली आहे.

विद्यालयातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 211 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी 209 विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या असून 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 33 विद्यार्थी 70 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे 174 विद्यार्थी आहेत. 

90 % पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 

1.अनुष्का सुनील कन्हैये  - 97.60%

2.युतिका संजय महाजन - 97.20%

3.कार्तिकेश आसाराम बारी - 97.00%

4.हर्षल नंदलाल पाटील - 96.40%

5.पियुषा जगदीश पाठक - 96.40%

6.आयुष किरण पाटील - 95.80%

7.वेदांत भगवान चौधरी - 95.20%

8.रुबल सुनील पाटील - 94.20%

9.वेदांत गणेश पाटील - 94.00%

10.पार्थ नितीन चौधरी - 93.20%

11.हिमांशू मनोज पवार - 93.20%

12.गणेश रवींद्र पाटील - 93.20%

13.समर्थ जगन्नाथ मराठे - 92.80%

14.रोहन किरण पाटील - 92.60%

15.नूतन विकास पाटील - 92.60%

16.उत्कर्ष योगराज रायसिंग - 92.40%

17.काजल अनिल कुंभार - 92.20%

18.सोहम महेंद्र पाटील - 92.20%

19.योगिता सतीश पवार - 91.80%

20.मयूर कैलास चौधरी -91.80%

21.विनित सुनील चौधरी- 91.40%

22.ज्ञानेंद्र प्रवीण पाटील - 91.40%

23.तन्मय देवानंद धनगर - 91.20%

24.वेदांत संदिप पाटील - 90.80%

25.भावार्थ प्रवीण पाटील - 90.80%

26.महेश निलेश पाटील - 90.80%

27.एकता नंदलाल मराठे - 90.80%

28.खुशी तुषार पवार - 90.80%

29.हेतल प्रवीण बाविस्कर - 90.60%

30.ईश्वरी प्रमोद तायडे - 90.40%

31.रितीका विकास महाजन - 90.20%

32.मानस विनोद जाधव - 90.00%

33.युक्ती भरत पाटील - 90.00%

यांचा समावेश आहे.

सर्व यशस्वी  विद्यार्थी मित्रांना मुख्याध्यापक व्ही.आर पाटील, विजया पाटील मॅडम , आर के माने,  उदय गुजर , पी सी पाटील, विनोद जाधव , व्ही ए निकम,  एम पी पाटील, ज्योतीसिंग राठोड, पी जे पाटील, डि आर सोनवणे, पौर्णिमा भादले, वैशाली पाटील, जयेश मंडपे, बाजीराव तायडे, संजय भादले, सौरव कुलकर्णी, डी जे बाविस्कर, जीवन पाटील या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले तर डी बी पाटील, यज्ञेश अत्तरदे विजय पाटील सचिन बारेला यांचे सहकार्य लाभले. या नेत्रदिपक निकालाबद्दल  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , संस्थाध्यक्ष पंकजभैया बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे , सर्व संचालक,  विभाग प्रमुख व मुख्याध्यापक व्ही.आर पाटील यांनी सर्व विद्यार्थी मित्र पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने