अनवर्दे -बुधगाव पी.टी.एस.विद्यालयात १०वी परिक्षेत प्राची दिपक सैंदाणे सर्वप्रथम तर स्वप्नील शिरसाठ द्वितीय

 अनवर्दे -बुधगाव पी.टी.एस.विद्यालयात १०वी परिक्षेत प्राची दिपक सैंदाणे सर्वप्रथम तर स्वप्नील शिरसाठ द्वितीय


चोपडा दि.८(प्रतिनिधी) :तालुक्यातील  अनवर्दे बुधगाव येथील ग्राम विकास शिक्षण मंडळसंचलित पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाचा दहावी फेब्रुवारी 2026 निकाल शेकडा 75 % लागला असून 5 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. कु. प्राची दिपक सैंदाणे 84.80*% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

यंदा 15 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले असून 8 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झालेले आहेत.द्वितीय क्रमांकावर स्वप्निल ईश्वर शिरसाठ याने 82.80 % गुण मिळवत बाजी मारली असून तृतीय क्रमांकावर कु. पूजा विकास बहारे 76.80% गुण प्राप्त करून स्थान मिळविले आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन प्रविण सुभाषराव साळुंखे,व्हा. चेअरमन ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे,  मुख्याध्यापक बळवंत सोनवणे ,वर्गशिक्षक भुपेश धनगर , सर्व संचालक मंडळ,विषय शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी बंधू, भगिनी  व पालकांनी  अभिनंदन करून कौतुक केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने