कस्तुरबा माध्यमिक विद्यालयातून पायल पाटील प्रथम ..!
चोपडा,दि.८(प्रतिनिधी) - येथील कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८१.४५ टक्के लागला असून विद्यालयातून कु. पायल नरेंद्र पाटील या विद्यार्थिनीने ९४.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.तर मानसी प्रमोद बडगुजर हिस ८१.२० टक्के गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय व तृतीय क्रमांक गायत्री संदीप महाजन ८०.००टक्के गुण मिळवले आहे. विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी विशिष्ट योग्यता श्रेणी प्राप्त करुन यशाला गवसणी घातली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष ॲड संदीप पाटील,सचिव डॉ स्मिता पाटील, कार्यकारी संचालक आदित्य पाटील,मुख्याध्यापक एस.एल. पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
========================
