नागलवाडी माध्यमिक विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम हेमंत अनिल पाटील प्रथम तर सपना कुंभार द्वितीय

 

नागलवाडी माध्यमिक विद्यालयाची  उज्वल यशाची परंपरा कायम हेमंत अनिल पाटील प्रथम तर  सपना कुंभार द्वितीय 

  चोपडा दि.८(प्रतिनिधी): चोपडा  एज्युकेशन सोसायटी संचलित नागलवाडी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळांच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करून विद्यालयाच्या उज्वल विषयाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९६.४२ टक्के लागला असून हेमंत अनिल पाटील या विद्यार्थ्याने ८४.४० टक्के गुण विद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. कुंभार सपना गोपाल या विद्यार्थिनीने ७७ टक्के गुण प्राप्त करत विद्यालयातून द्वितीय तर मुलींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर ७३ टक्के गुण मिळवत घनश्याम रवींद्र कुंभार याने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त वातावरणात हे यश मिळवले आहे हे विशेष. 

      विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, कार्यकारणी सदस्य सौ. उर्मिलाबेन गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी , भूपेंद्रभाई गुजराथी, रमेश जैन तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी पाटील, समन्वयक गोविंद गुजराथी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने