हातेड शिवाजी हायस्कूलचा १०वी परिक्षा निकाल शेकडा ६४टक्के..
चोपडा,दि.८(प्रतिनिधी) तालुक्यातील हातेड येथील श्री.शिवाजी हायस्कूल, हातेड या विद्यालयाचा इ 10 वी चा निकाल शेकडा 64.70 ईतका लागला असून विद्यालयातून कुमारी तनुश्री प्रवीण सोनवणे तिने शेकडा ८५.६० टक्के गुण मिळत विद्यालयातून प्रथम येण्याच्या मान मिळवला आहे.
तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी कु.मानसी कैलास सनेर हिने शेकडा 75.80 टक्के गुण मिळवाल द्वितीय क्रमांकावर बाजी मारले आहे तर कु.कोमल प्रशांत सोनवणे 75.00 टक्के गुण मिळवत तृतीय आली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे मानद सचिव निलेशजी भोईटे, संचालक मंडळ स्कूलकमेटी चेअरमन अॅड. सुरेश आनंदराव सोनवणे,मुख्याध्यापक पी सी पाटील,पर्यवेक्षक पी.आर.पाटील तसेच एम.पी. सांगळे , एम.आर.पाटील , जी. बी.पाटील सर,आर.एल.तायडे, के.आर.पाटील मॅडम, एस.आर.शिंदे मॅडम,संचालक मंडळ, सर्व शिक्षक बंधू, भगिनी व पालकांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
