भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्याताई नरेश महाजन यांच्या भेटीने रावेरला कार्यकर्त्यांत नवचैतन्य

 भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. संध्याताई नरेश महाजन यांच्या भेटीने रावेरला कार्यकर्त्यांत नवचैतन्य 

चोपडा दि.१०(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी आढावा  बैठकी निमित्त जळगाव पूर्व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. संध्याताई नरेश महाजन व सौ. वैशालीताई मितेश भावसार (शहराध्यक्ष महिला मोर्चा भाजपा चोपडा) , सौ.लताताई खैरनार ,सौ. भाग्यश्री चौधरी यांनी पक्षवाढीसाठी व संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने  रावेर  येथे भेटी दिली असून  महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली असून पक्ष बळकट करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले. 

या प्रसंगी रावेर येथील सौ संगीता भास्कर महाजन  ( नगराध्यक्ष रावेर ) सौ. रंजना पाटील ( माजी जिल्हा अध्यक्ष महिला मोर्चा जळगाव ) ,सौ अर्चना पाटील  (नगरसेविका) , सौ. सीमा जमादार ( नगरसेविका ), सौ गोमती बारेला ( सदस्य महाराष्ट राज्य परिषद भाजपा), सौ .योगिता महाजन ( नगरसेविका)  ,सौ जयश्री महाजन ( नगरसेविका ) त्याचबरोबर सौ प्रमिला पाटील ( नगरसेविका ) श्री रवींद्र पाटील , श्री सूर्यकांत देशमुख या मान्यवरांची  उपस्थिती होती भेटी दरम्यान सौ रेखाताई बोंदे ( जिल्हा उपाध्यक्ष जळगाव ) यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी भाजप महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने