कुंड्यापाणी गावी दोन आदिवासी बांधव घरकुलापासून वंचित..१३पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा
चोपडा,दि.१०(प्रतिनिधी) : तालुक्यातील कुंड्यापाणी गाव पेसा श्रेत्रातील असल्यावरही वारंवार अर्ज करून घरकुल मिळत नसल्याची कैफियत रेवलसिंग गेवरसिंग पावरा,तुकाराम भावसिंग पावरा यांनी प्रशासनाकडे मांडली आहे.याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक दूर्लक्ष का करीत आहेत ? याचा खुलासा करवा व आम्हास ताबडतोब घरकुल मिळावे यासाठी दोन्ही गावकऱ्यांनी दि.१३/०४/२०२६ रोजी बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.विशेष म्हणजे या दोन्ही गावकऱ्यांचे नाव पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या प्रशासन शिफारस यादीत असल्यावरही टोलवाटोलवी चालू असल्याने गावकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
सदरील रेवलसिंग गेवरसिंग पावरा,तुकाराम भावसिंग पावरा यांनी ग्रामपंचायत कार्यालयात नमुना ८ नं उतारा व घरकुल ला लागणारे सर्व कागदपत्र जमा केलेले आहेत तरीही यांना घरकुल योजने पासुन वंचित ठेवण्याचं काम ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रतिनिधि करीत असल्याचा आरोप त्यांनी केलाआहे. प्रधानमन्त्री आवास योजनांचा श्री. रेवलसिंग गेवरसिंग पावरा यांचा क्रमांक एमएच १३३९८६९६८ व श्री. तुकाराम भाव सिंग पावरा यांचा एमएच १३४०१५१९६ क्रमांक असुन देखील घरकुल का देण्यात आले नाही याचा खुलासा द्यावा व आम्हाला घरकुल लाभ ताबडतोब मिळावे म्हणून दि. ३०/३/२०२६ रोजी ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज केला आहे. परंतु त्यांनी आजपावेतो कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे आम्ही दिनांक १३/४/२०२६ पासुन गृप ग्रामपंचायत बिडगांव कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे .तसे पत्रक गटविकास अधिकारी पंचायत समिती, चोपडा व ग्रामसेवक, गृप ग्रामपंचायत बिडगांव यांना दिले असल्याचे स्पष्ट केले आहे.
