भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्याधिकारींसह सभापतींचा मिरवणूक रुट व पुतळा सुशोभीकरण पाहणी

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्याधिकारींसह सभापतींचा मिरवणूक रुट व पुतळा सुशोभीकरण पाहणी

चोपडा दि.१०(प्रतिनिधी):  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल च्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्या कडून प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यात आली आणि मिरवणुकीचा रूट बघून येणाऱ्या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्यात आले.डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला व आजूबाजूच्या परिसराला रंग रंगोटी करण्यात येत असून आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.

   यावेळी मुख्याधिकारी रामनिवास झंवर , स्वच्छता सभापती रमेश  शिंदे,माजी नगरसेवक अशोक बाविस्कर , पाणी पुरवठा सभापती किशोर चौधरी,गटनेते रमाकांत  ठाकूर,नगरसेविका सौ.वंदना बाविस्कर,नगरसेवक ईश्वर  अलकरी,सुधाकर  बाविस्कर, समाजसेवक समाधान  सपकाळे,समाज सेवक उद्योगपती रविंद्र  पाटील,पत्रकार मिलिंद सोनवणे, नम्रता ताई पाटील यांचे स्वीय सहाय्यक निलेश जाधव,बांधकाम अभियंता डिगंबर वाघ ,स्वच्छता विभाग जयेश भोंगे ,यांच्यासह चोपडा शहरातील भीम सैनिक मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने