समाजकार्य महाविद्यालयाकडून मुळ्यावतार गावी विविध उपक्रम साजरे

 समाजकार्य महाविद्यालयाकडून मुळ्यावतार गावी विविध उपक्रम साजरे 

चोपडा,दि.९(प्रतिनिधी)...भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जातात.नुकतेच मुळ्यावतार या आदिवासी डोंगराळ भागात टी वाय बीएस डब्ल्यू या वर्गाच्या विद्यार्थ्यांना समुदाय संघटन या तत्वाचा उपयोग करून ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांच्या समस्या समजून जीवन कसे जगावे आणि दैनंदिन जीवन जगत असतांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे समजून घेऊन शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी वाचनाची गरज म्हणून  वाचनालयाची स्थापना करण्यास विविध उपक्रम राबविण्यात आले.

समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.मोहिनी उपासनी यांच्या संकल्पनेतून विविध योजनांची माहीती आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड कशी निर्माण होईल यासाठी टी वाय बीएस डब्ल्यू च्या विद्यार्थ्यांना सोबत मार्गदर्शन करण्यात आले.

      आदिवासी बांधवामध्ये  बालविवाह रोखण्यासाठी व बालविवाह का करू नये यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.पर्यावरणा विषयी माहीती देण्यात आली.बेटी बचाव बेटी पढाव यावर मार्गदर्शन केले.  आदिवासी बोली भाषेतून मुलामुलींना डॉक्टर वकील इंजिनिअर पोलीस यांचे फोटो दाखवून तुम्ही ही यांच्यासारखे जीवन बदलू शकतात. त्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे असे समजून सांगण्यात आले.

  क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा.डॉ.मोहिनी उपासनी यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मुळ्यावतार हे आदिवासी डोंगराळ गाव निवडून समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती केली.

यासाठी त्यांना संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी,आशिष गुजराथी,प्राचार्य सौंदानकर,उपप्राचार्य आशिष गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले. आणि सरपंच दत्ता पावरा आणि ग्रामस्थांनी या उपक्रमा बद्दल आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने