विरवाडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शांतता कमिटीची बैठक संपन्न

 विरवाडे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शांतता कमिटीची बैठक संपन्न         


चोपडा दि.१०(प्रतिनिधी): तालुक्यातील विरवाडे  येथे चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाने 14 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी.आय पोलीस निरीक्षक मधुकर साळवे  स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी चोपडा पंचायत समितीचे माजी सभापती आत्माराम गोरख माळके तसेच पोलीस पाटील  महारु हरि कोळी, ग्रामपंचायत सदस्य विनोद युवराज शिरसाठ,भरत भीमराव शिरसाठ तसेच नाना उखर्डू वाघ व चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 

बैठकीत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे  यांनी संबोधित करतांना जयंती संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केले व जयंती उत्सव एकदम शांततेने साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच आत्माराम  माळके यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन भरत भीमराव शिरसाठ यांनी केले.              यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुपडू रतन गोलाईत,खजिनदार गौतम भिमराव बाविस्कर,, सचिव जितेंद्र युवराज शिरसाठ, सदस्य संदीप रावण सैंदाणे, राजेंद्र भीमराव शिरसाठ,दीपक मानकू सोनवणे, सुरेश आनंदा सोनवणे,समाधान शिवराम शिरसाठ व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने