चोपडा सकल जैन समाजातर्फे ९ एप्रिल विश्वशांती नवकार दिवस उत्साहात साजरा
चोपडा दि.९(प्रतिनिधी) : जीतो संघटनेच्या आवाहनानुसार सकल जैन समाज चोपडा तर्फे 9 एप्रिल 2026 रोजी विश्वशांती नवकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८:०१ मिनिटांनी मेन रोड वरील डॉ. निर्मल टाटिया यांचे प्रांगणचे हॉल येथे सामूहिक नवकार मंत्राचे स्मरण सुरू करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार कैलास बापू पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराती ,तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप साहेब , नगरसेवक तिलकचंद शहा व सकल जैन समाजाचे पदाधिकारी यांचे शुभ हस्ते कळश स्थापना करण्यात आली.
तद्नंतर तहसीलदार थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जैन समाजाने विश्वशांती साठी महत्वाचे पाऊल उचललेले असून मागील काही दिवसापासून जागतिक स्तरावर युद्ध सुरू असताना 9 एप्रिल च्या पूर्वसंध्येलाच अमेरिका व इराण चे युद्ध थांबवण्याचे घोषित झाले व विश्वशांतीसाठी भारतातर्फे महत्त्वाचे पाऊल उचलले गेले ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे
साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,आत्मशुद्धीसाठी मनशांतीसाठी व विश्वशांतीसाठी नवकार मंत्राचे स्मरण अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे .चंद्रहास गुजराती यांनी युवक वर्ग धर्म संस्कृतीशी जोडला पाहिजे या दृष्टीकोनातून जैन धर्मीय सदैव प्रयत्न करत राहतात असे गौरवोद्गार काढले,
सदरील कार्यक्रमाला उद्योजक रवींद्र पाटील, नगरसेविका निशा जैन , गोसन्मान समितीचे के.डी. चौधरी , सतीश पाटील, देवकांत चौधरी,सोबत जैन समाज बांधव व इतर धर्मिय बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते
सकल जैन समाज चे पदाधिकारी रमेश जैन ,सुभाष चंद बरडीया , विनोद टाटिया, मोहनलाल श्रावगी, दगडूशेठ जैन,, राजेंद्र जैन, अनिल बुरड, यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीते साठी समितीचे सदस्य चेतन टाटीया, दर्शन देशलहरा, मयुरेश जैन, प्रा. सौरभ जैन, विशाल जैन, पवन जैन, राजस जैन यांनी प्रयत्न केले
डॉ. निर्मल टाटिया यांच्यातर्फे कोल्ड्रिंक चे वितरण करण्यात आले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रा. गौतम छाजेड, यांच्यातर्फे करण्यात आलीकार्यक्रमाचे शेवटी 27 एप्रिल ला होणाऱ्या गो सन्मान अभियान ला समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलीकार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक राखेचा सूत्रसंचालन चेतन दर्डा तर आभार प्रदर्शन अंकिता दर्डा यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जैन संघटना, नवयुवक मंडळ, बहु मंडळ आदीं सदस्यांनी मेहनत घेतली.

