नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव शांततेत संपन्न

 नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव शांततेत संपन्न 

""""""""""""""""""""""""""""""""""


धरणगांव दि.२६(प्रतिनिधी)तालुक्यातील नांदेड येथे वामन महाराज यांचा जन्मोत्सव दर वर्षीप्रमाणे  साजरा करण्यात आला.

 या समाधी मंदिराची ख्याती अशी आहे की, येथे येणारे प्रत्येक भाविक आपले मनातील भावना वामन महाराज यांच्या समाधी पुढे नतमस्तक होऊन   व्यक्त करतात आणि त्यावेळी इच्छा पूर्ण होते अशी आख्यायिका आहे.म्हणून   वामन महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होतो . येथे कोणतीही दान पेटी  आहेर स्वीकारला जात नाही, उलट पक्षी प्रत्येक भाविकांचा सत्कार करण्यात येतो.  वामव महाराज यांचा आशिॅवाॅद आपल्या साठी शुभ दायक आहे. यश दायक आहे, लाभ दायक आहे, म्हणूनच  सैंदाणे परिवाराकडून  भाविकांना आमंत्रित केले जाते. या वर्षी अन्न दानाचा कार्यक्रम वामन महाराज यांची बहिण  सुमनबाई शिवदास गायकवाड मु.पो.निमगव्हाण ता.चोपडा ह.मु.कलवा ठाणे तसेच (वामन महाराज यांचे भाचे अॅड.संजय गायकवाड ) यांच्या कडुन  झाला. त्यात महापुजेचा मान देखील गायकवाड परीवारास देण्यात आला. विशेष म्हणजे शहाड वरून सिध्दार्थ नंन्नवरे यांनी सैंदाणे परीवाराचा तर गायकवाड परीवाराने देखील डाॅ. पृथ्वीराज सैंदाणे यांच्या सत्कार केला. 

या ठिकाणी बाहेर गावावरून येणारे भावीक  संभाजीराव सैंदाणे  (पिंप्राळा)संजय कदम, दिलीपराव नंन्नवरे , पितांबर नंन्नवरे ,  राजेंद्र सैंदाणे,  वंदनाताई  भालेराव, मंगलाबाई बाविस्कर, नानासाहेब मोरे,  मधुकर सोनवणे  ,  करंकाळ ,  सुमन मोरे, जितेंद्र मोरे, संदानशिव परीवार, गायकवाड ,  अनिल सैंदाणे,   मिनाक्षी बाविस्कर,  मनोज महाले  हुकुमचंद चव्हाण ,   तात्या चव्हाण  वामन मोटर ड्रायव्हींग स्कुल चे मालक प्रभाकर मोरे   सुनील सैंदाणे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने