जीवरक्षक उमेश पाटील सह भावाच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
गणपुर,ता.चोपडा दि.२६ता 26(प्रतिनिधी): पोहता येत नसतानाही येथील अनेर नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 ) हा देवदूत ठरला आहे. ओम याच्या धाडसामुळे चौघांचे प्राण वाचले. ओम याच्या या धाडसाची दखल घेत जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या वतीने त्याचा व त्याच्या मोठ्या भावाचा शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दि.२५ मार्च रोजी उमेश (ओम) पाटील याचा व त्याच्या परिवाराचा जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते जैन हिल्स वर सत्कार करण्यात आला.
यावेळी उमेश सोबत परिवारातील सदस्य,पत्रकार अॅड. बाळकृष्ण पाटील व स्वरूपकुमार लुंकड हे ही उपस्थित होते. अशोक जैन यांनी ओम च्या पालकांशी संवाद साधत त्याच्या धाडसाचे यावेळी कौतूक केले
...........................
