जागतिक महिला दिनी कृतज्ञता सोहळा साजरा

 जागतिक महिला दिनी कृतज्ञता सोहळा साजरा

 चोपडा दि.९(प्रतिनिधी): येथील विवेकानंद विद्यालयात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त इयत्ता सातवी" बहिणाबाई" या  वर्गातील 21 विद्यार्थिनी व शाळेतील सर्व शिक्षिकांनी  शिक्षक राकेश विसपुते यांची  आई व धर्मपत्नी यांचा गुलाब पुष्प,  व भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करत  सन्मान केला.

​ ८ मार्च... जागतिक महिला दिन! हा दिवस म्हणजे केवळ कॅलेंडरमधील एक तारीख नसून, स्त्रीशक्तीच्या अफाट कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस असल्याने हा गौरव करण्यात आला आहे.

​​ स्त्री: एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

​आज आपण मागे वळून पाहिले, तर लक्षात येते की स्त्रीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. घराची चौकट सांभाळणारी 'गृहिणी' असो किंवा आकाशाला गवसणी घालणारी 'अंतराळवीर'; प्रत्येक रूपात तिने आपली जिद्द सिद्ध केली आहे. सावित्रीबाई फुलेंनी पेटवलेली ज्ञानाची ज्योत आज घराघरात प्रकाश पसरवत आहे.

​आजची स्त्री केवळ 'चूल आणि मूल' पर्यंत मर्यादित नाही. ती डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, सैनिक आणि उद्योजक म्हणून समाजाचा कणा बनली आहे. पण प्रगतीसोबतच आजही तिला अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते. स्त्रीला केवळ सन्मानाची घोषणा नको आहे, तर तिला सुरक्षितता, समानता आणि स्वबळावर जगण्याची संधी हवी आहे असे मत राकेश विसपुते यांनी यांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने