चोपडा नगरपरिषद नाट्यगृहात जागतिक महिला दिनी रेकी उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन
चोपडा,दि.९(प्रतिनिधी) येथे जागतिक महिला दिनानिमित्त माजी आमदार सौ. लताताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. नम्रताताई पाटील व मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून रेकी उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन व सेमिनार आयोजित करण्यात आला होते.
या कार्यक्रमात रेकी कोच श्रीमती समृद्धी रडे यांनी रेकी उपचार पद्धतीचे महत्त्व, आरोग्यावर होणारे फायदे तसेच दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये सुमारे 150 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा सौ. नम्रताताई पाटील यांनी प्रतिपादन केले की, आजच्या काळात महिला घराबरोबरच कामानिमित्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांना शारीरिक थकव्याबरोबरच मानसिक ताण देखील जाणवतो. अशा परिस्थितीत रेकी उपचार पद्धती महिलांना मानसिक व शारीरिक ऊर्जा देण्यास उपयुक्त ठरू शकते. नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी महिलांसाठी देखील ही पद्धत अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांनी महिलांनी रेकी उपचाराचा लाभ घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग करून आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन स्वच्छता निरीक्षक दिपाली साळुंके यांनी केले
कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका भारती चौधरी, पूजा देशमुख, उपमुख्यअधिकारी संजय मिसर करनिरीक्षक संदीप गायकवाड, शहर समन्वयक स्वप्निल धनगर आदी मान्यवर उपस्थित होते.
