धडाकेबाज पीएसआय भगवान कोळी यांची नागपूर येथे क्राईम ब्रँच ला प्रमोशनवर नियुक्ती 🔲 पोलिस शिपाई पासून तर अधिकारीपर्यंत खडतर प्रवास.. लहानश्या खेड्यातून बनले पोलीस खात्याची शान..

 धडाकेबाज पीएसआय भगवान कोळी यांची नागपूर येथे क्राईम ब्रँच ला प्रमोशनवर नियुक्ती

🔲 पोलिस शिपाई पासून तर अधिकारीपर्यंत खडतर प्रवास.. लहानश्या खेड्यातून  बनले पोलीस खात्याची शान..


चोपडा दि.2(प्रतिनिधी)मुंबई चा फौजदार हा मराठी चित्रपट एकेकाळी खूप गाजला होता.प्रत्येकालाच वाटत होते की मी पोलीस झालो पाहीजे, फौजदार झालो पाहीजे.खाकीची वर्दी घातलेला पोलीस बघून अधिकारी बघून एक बाणेदारपणा रुबाबदार पणा समोर दिसतो.तशीच एक जिद्द ध्येय आत्मसात करून छोट्याश्या खेळयातील भगवान खंडू कोळी यांनी स्वतःला घडवत उंच भरारी घेतली आहे.आई वडील मोलमजुरी करत असत.मात्र शालेय जीवनापासूनच रनिंग करून अनवाणी भगवान कोळी हे शाळेत जात.आश्रम शाळेत शिकून पोलीस भरतीत प्रयत्न करून ते पोलीस शिपाई झालेत.त्यानंतर त्यांनी पोलीस खात्यात होणाऱ्या मैदानी स्पर्धेत सतत भाग घेऊन प्रथम क्रमांकच पटकवून आज पर्यंत तो आलेख सुरूच ठेवला असून भगवान कोळी यांनी 1996पासून वेगवेगळ्या शहरात ड्युटीबजावली.चोपडा,अमरावती,जळगाव,शहादा,सिन्नर,नंदुरबार, सारंगखेडा,मालेगाव याठिकाणी त्यांनी पोलीस खात्यात कामगिरी करून चोपडा येथील तरुणांना दररोज संध्याकाळी विनामूल्य मार्गदर्शन व ग्राउंडवर भर्तीपूर्व प्रशिक्षण देण्याचे काम केले.त्यांनी आतापर्यंत शेकडो तरुणांना प्रशिक्षण देऊन पोलीस खात्यात भरती केले आहे.

मालेगाव सारख्या संवेदनशील ठिकाणी हिंदू मुस्लीम एकता अशी अबाधित राहील यासाठी काम केले.नुकतीच त्यांची पीएसआय पदावरून  सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नागपूर येथे गुन्हे शाखेच्या नॉरकोटिक्स विभागात नियुक्ती करण्यात आली असून तेथेही ते त्यांच्या कार्याची छाप सोडतील.भगवान कोळी यांनी आतापर्यंत दिल्ली हिमाचल आणि विविध ठिकाणी पोलीस खात्यामार्फत होणाऱ्या स्पर्धेत अनेक  विक्रम नोंदविले असून 100पैकी 100 गुण पटकवून विक्रम कायम ठेवला असून अतिशय मेहनती रुबाबदार आणि डॅशिंग मनमोकळ्या स्वभावाचे उत्कृष्ट गायक म्हणून  त्यांची एक दिलखुलास अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने