रोहन दीपककुमार राखेचा चार्टर्ड अकाउंटंट पदवी परीक्षेत उत्तीर्ण
चोपडा,दि.२(प्रतिनिधी) येथील व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष व जैन दादा वाडी ट्रस्टचे विश्वस्त, न्यू अपना स्टोअर्स चे संचालक,श्री दीपक धरमचंद जैन यांचे सुपुत्र ची रोहन दीपककुमार राखेचा (C.A.) यांनी चार्टर्ड अकाउंटंट ही पदवी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली.
रोहनच्या यशाबद्दल महावीर पतपेढीचे संस्थापक चेअरमन प्रा.शांतीलाल बोथरा जैन समाजाचे संघपती सुभाष चंद्र बरडीया, संघपती गुलाबचंद देसरडा, दादावाडी ट्रस्ट अध्यक्ष बाबुलाल बोथरा,भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निर्मल बोरा, जैन समाजाचे सचिव विनोद टाटीया, पीपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन सुनील बुरड, दादावाडी ट्रस्ट चे ट्रस्टी सुनील बरडीया आदींनी अभिनंदन केले
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, माजी नगरसेवक संजय कानडे, महिंद्र(पप्पू भाऊ) सोनार, भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र बोथरा, जिल्हा सचिव दर्शन देशलहरा, माजी तालुकाध्यक्ष आदेश जैन, तालुकाध्यक्ष गौरव कोचर यांनी शुभेच्छा दिल्या
