स्वच्छता कामगार हेच खरे आरोग्यदायी जीवनाचे हिरो :तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी
धरणगाव,दि.११(प्रतिनिधी) : येथील कर्तव्य बहुउद्देशीय संस्था आणि नवनिर्वाचित नगरसेवक सुनील पंढरीनाथ चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथे संत गाडगेबाबा स्वच्छता कामगार पुरस्कार सोहळ्यात नगर परिषदेतील स्वच्छता काम करणारे १० स्वच्छता कामगारांना उत्कृष्ट स्वच्छता कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून धरणगाव तालुक्याचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे, साहित्यिक बी. एन. चौधरी, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, शहर विकास आघाडीचे गटनेता निलेश चौधरी, प्रा. डॉ. कांचन महाजन, डॉ. रोहिणी शिंदे, श्रीजी जिनिंगचे संचालक नयन गुजराती, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संजय कोठारी, नगरसेवक सुनील चौधरी उपस्थित होते.
भारत माता आणि गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला वरील सर्व अतिथींनी मार्गदर्शन केले. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी देशाचे खरे आरोग्य दूत असून त्यांच्यामुळे जीवन आरोग्यदायी राहत असल्याचा खुलासा केला. अध्यक्षीय भाषणात या सर्व कर्मचाऱ्यांमुळेच गाडगे महाराजांची स्वच्छतेचे परंपरा अखंडीत सुरू राहिली. घर, गल्ली व गावाची स्वच्छता करता करता हे सर्व कर्मचारी मनाची सुद्धा स्वच्छता करत असल्याचे प्रतिपादन डॉक्टर संजीव कुमार सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. महाजन यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक सुनील चौधरी यांनी केले तर डी. के. चौधरी यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
यांना भेटला स्वच्छ्ता पुरस्कार
अजय प्रताप सोनवणे,चेतन राजू पचेरवार, भगवान गोविंद पारधी, हर्षल रामचंद्र बत्तीस, विजय रमाकांत सोनवणे, सुखदेव कन्हैया वाघरे, पिंकी गोविंद बिवालकर, उषाबाई अरुण सोनवणे, भारती संतोष वाघरे, सीमा भिकन मोरे.
