भोकर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्वान महिलांचा सन्मान.....! ♦️प्रा.भाऊसाहेब सोनवणे युवा ग्रुप चा अनोखा उपक्रम

 भोकर येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्वान महिलांचा सन्मान.....!

♦️प्रा.भाऊसाहेब सोनवणे युवा ग्रुप चा अनोखा उपक्रम

चोपडा दि.११(प्रतिनिधी):प्रा.भाऊसाहेब सोनवणे युवा ग्रुप तर्फे श्री.विशालदादा देवकर ( सचिव,श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ जळगांव )यांचे सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त भोकर गावातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर यांचा सुद्धा या सन्मान सोहळा करण्यात आला.

जगाला प्रेम,माया,सामर्थ्य आणि प्रेरणा देणाऱ्या सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

 कर्तृत्व,जिद्द आणि धैर्याने समाज अधिक सुंदर व सक्षम होत आहे.या गोष्टी स्त्रीयांमध्ये आहेत म्हणून स्त्री ही शक्ती आहे,स्त्री ही प्रेरणा आहे,स्त्री शिवाय जीवनाची कल्पनाही अपूर्ण आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले  

यावेळी भोकरच्या सरपंच सौ.प्रमिलाबाई नंदलाल सोनवणे,शासकीय सेवेत ज्यांची नुकतीच जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली त्या सौ.ममता भारत सोनवणे यांचे कुटुंबीय,इंजि.मोनालिका किशोर पवार,सौ.चंद्रभागा प्रभाकर कोळी,योगिता ताई सोनवणे,हेमलता चेतन पवार ( पोलीस पाटील ),इंदुबाई बापू पवार,अलका विलास सोनवणे,कविता ताई सपकाळे आदींचा सन्मान करण्यात आला.याप्रसंगी गावातील असंख्य महिला व नागरिक, प्रा.भाऊसाहेब सोनवणे युवा ग्रुप चे सर्व सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने